संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

शेतकरी संघटना लढविणार लोकसभेच्या सर्व जागा 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अपयशी ठरल्याने समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन शेतकरी संघटना लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविणार आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. दहा) राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीविषयी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप युतीला तिसरा सशक्त राजकीय पर्याय म्हणून शेतकरी संघटना समविचारी पक्षांना एकत्र घेऊन मैदानात उतरणार आहे. 
महाराष्ट्रातील समविचारी पक्ष, संघटनांना एकत्र करून कॉंग्रेस आघाडी व भाजप आघाडीला सशक्‍त पर्याय देण्यावर बैठकीत एकमत झाले. हातकणंगले मतदारसंघातून रघुनाथ पाटील, बारामतीमधून शिवाजी नांदखिले, बीडमधून कालिदास आपेट, नाशिकमधून केशवराव पाटील, सांगलीतून अशोकराव माने, परभणीतून बंडू सोळंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला शेतकरी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ऍड. अजित काळे यांच्यासह सादिक कुरैशी, बाळासाहेब पटारे, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, विमल आकणगिरे, बंडू सोळुंके, केशवराव पाटील, धनंजय काकडे आदी उपस्थित होते. 

आघाडी व युतीसोबत न जाणाऱ्या पक्ष, संघटनांचा मिळून एक तिसरा सशक्त राजकीय पर्याय उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व पर्याय खुले असून वंचित आघाडी, समाजवादी पक्ष, बसप आदींशी आमचा संवाद सुरू असल्याचे रघुनाथदादांनी बैठकीत सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT